संस्थेला दिलेली देणगी आयकर कलम क्र. 80G अंतर्गत कर सवलतीत पात्र आहे.
• वस्तुरुपी देणगी: चिल्ड्रन पार्कसाठीची साधने, विविध मेडिकल इन्स्ट्रूमेंट्स स्वयंपाकघरातील साधने, वॉर्डमधील साहित्य, मनोरंजनाचे साहित्य, बेडशीट, ब्लॅकेट, शाली, पडदे आदी.
दर महिन्याला लागणारी वर्तमानपत्रे,
मासिके, साबण, फिनाईल, दूध, भाजी वा फळे यांची नियमित जबाबदारी घेणे.
• रुग्ण दत्तक योजना : आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णाचा मासिक खर्च / औषधोपचार / फिजिओथेरपीच्या खर्चाची नियमित जबाबदारी घेणे.
• अन्नदान योजना : रु.५१,०००/- एकरकमी देणगी दिल्यास आपल्या स्वकियांच्या स्मरणार्थ दरवर्षी ठराविक तारखेला / तिथीला कायमस्वरुपी भोजनव्यवस्था.
• लघु अन्नदान योजना : रु.२१,०००/- एकरकमी दिल्यास वर्षातील ठराविक तारखेला/तिथीला आप्तांच्या
स्मरणार्थ न्याहारी / अल्पोपहाराची कायमस्वरूपी व्यवस्था केली जाईल. सहभोजन : वाढदिवस / वर्धापनदिन रुग्णांसोबत साजरे करणे. त्यानिमित्ताने भोजन अथवा अल्पोपहार घेणे.
• स्वानंद यात्री : रोज एक रूपया याप्रमाणे आपल्या
वाढदिवशी रु. ३६५ ची देणगी देणे.
• अन्य ऐच्छिक देणगी. सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सहभाग. घरगुती कार्यक्रम 'स्नेहबंध'मध्ये साजरे करणे.
• आपली छोटीशी सामिलकी आम्हाला अधिक सबळ करेल!