• रजि. नं.: ई-२४६५/सांगली
  • स्थापना : ९ जुन २०२०
संस्थेला दिलेली देणगी आयकर कलम क्र. 80G अंतर्गत कर सवलतीत पात्र आहे
24 Hours Service

Online Appointment

Working Hours

  • Sun - Sat : 9:00 AM - 08:00 PM
Make a appointment
Donation

Donate Us

संस्थेला दिलेली देणगी आयकर कलम क्र. 80G अंतर्गत कर सवलतीत पात्र आहे

Donate Us
Emegency Cases

0233-3551822

Get All time support for emergency.


Personal care
& healthy living

We provide best leading medicle service

Services
0k

Happy People

0+

Surgery Comepleted

0+

Expert Doctors

0

Worldwide Branch

0233-3551822

Book appointment

Videos

स्नेहबंध केअर सेंटर

स्नेहबंध यमुताई पाटील आजी

उत्साह भिडे आजींचा........

देहाची तिजोरी......@स्नेहबंध केअर

स्नेहबंध फौंडेशन संचलित, स्नेहबंध केअर सेंटर

Snehbandh care center vishrambag , sangli

'स्नेहबंध' काळाची गरज

आजच्या धावपळीच्या जगात आपण सर्वजण आपापल्या कामात दिवसभर गुंतुन गेलेलो आहोत. दिवसाचे २४ तास एकेकवेळा कामाला अपुरे पडतात. दुर्दैवाने कुटुंबातील जिवलग व्यक्तीला अंथरुणावर पडुन राहायची वेळ आली अथवा बेडरेस्ट सांगितली तर मनात असूनही आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही. अशावेळी 'स्नेहबंध' चे सहकार्य आपण घेऊ शकता.  

पॅरालिसिस, बेडसोअर्स, कोमा, फ्रेंक्चर, सेरेब्रल पाल्सी अशा आणि अन्य रुग्णांसाठी 'स्नेहबंध' आपुलकीजन्य प्रेमाने कार्यरत आहे. निर्धास्तपणे आपण आपल्या कुटुंबातील रुग्णास 'स्नेहबंध' वर सोपवा. इथे रुग्णांची काळजी खूप मायेने व्यवस्थितरित्या घेतली जाते.

'स्नेहबंध' एक असे केंद्र आहे की रुग्णांना ते आपले 'घर'च वाटेल. औषधोपचार, नर्सिंग केअर, जेवणखाण सर्वच गोष्टींची व्यक्तिगत काळजी इथे घेतली जाते.

प्रसन्न वातावरण, हवेशीर जागा, आपल्या जिवलगांना आपण केव्हाही भेटु शकता 'स्नेहबंध' मध्ये.

रुग्णांचा आजार कदाचित आम्ही बरा करु शकणार नाही... पण ते आजारी आहेत हे विसरायला लावण्याचा नक्कीच प्रयत्न करु..!

'स्नेहबंध' कशासाठी ?

ज्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं अशा जिवलगांना/ वृद्धांना काही इजा झाली, अधूपण आले किंवा संपूर्ण बेड-रेस्ट देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला तर मनात असून सुद्धा त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही अशा कुटुंबांची संख्या वाढत चालली आहे. यात दोष कोणाचाच नाही. दोष असलाच तर बदलत चाललेल्या व स्पर्धात्मक बनत असलेल्या जीवनशैलीचा आहे. या परिस्थितीत अशा व्यक्तींची काळजी घेण्यासाठी 'केअर सेंटर' ही काळाची गरज आहे.

'स्नेहबंध' मध्ये मुख्यतः पॅरालिसिस कोमा, फ्रेंक्चर, अस्थिव्यंगता, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदत्व, वयोमानामुळे आलेले मानसिक दौर्बल्य यांसारख्या व अन्य व्याधींनी शारीरिक दृष्ट्या अक्षम झालेल्या रुग्णांना आवश्यक सेवा पुरवण्यात येते. २४ तास संपूर्ण नर्सिंग केअर, डॉक्टरांची नियमित फेरी, डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार आहार, फिजिओथेरपी आदी बाबींचा सेवांमध्ये समावेश आहे.

गरजेनुसार 'स्नेहबंध' मध्ये ऑक्सिजन सिलेंडर, नेब्यूलायझर, सक्शन मशीन, अंबू बॅग यांसारखी शरीर प्रकृतीच्या दृष्टीने आणीबाणीच्या काळात लागणारी उपकरणे उपलब्ध आहेत, या उपकरणांचा सक्षमपणे उपयोग करू शकणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्गही आहे. आवश्यकता भासल्यास पॅथॉलॉजी, रुग्णवाहिका, एक्स-रे तपासणी या सेवाही 'स्नेहबंध' देते.

'स्नेहबंध' मध्ये कोणत्या प्रकारचे रुग्ण दाखल करून घेतले जातात ?

•कोणत्याही शारीरिक आजारामुळे वा अपघातामुळे परावलंबित्त्व आलेली व्यक्ती.

•वयोमानामुळे मानसिक दौर्बल्य आलेली व्यक्ती.

•सातत्याने सहचराची आवश्यकता भासणारी कोणतीही व्यक्ती.

•कुठलेही संसर्गजन्य आजार असलेले रुग्ण तसेच मनोरुग्ण दाखल करून घेतले जात नाहीत.

'स्नेहबंध' म्हणजे वृद्धाश्रम नव्हेच !

'स्नेहबंध' म्हणजे वृद्धाश्रम नाही. वृद्धाश्रमांमध्ये परावलंबित्व आलेल्या रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही, तर 'स्नेहबंध' मध्ये परावलंबित्व हाच दाखल करुन घेण्याचा मुख्य निकष आहे.

'स्नेहबंध' मध्ये दाखल होताना कुठल्याही वयोगटाची अट नाही. त्यामुळे सर्व वयोगटातल्या परावलंबित्व आलेल्या रुग्णांना आवश्यक ती सेवा दिली जाते. सर्व वयोगटाच्या रुग्णांना 'स्नेहबंध' सेवा देणार आहे.

'स्नेहबंध' ची विशेषता

• अत्याधुनिक सुविधांसह पन्नास रुग्णांची सोय असलेली सुसज्ज वास्तू. या वास्तूत प्रसन्न, हवेशीर जनरल वॉर्ड्स व स्पेशल सेमी स्पेशल रूम्स.

• आवश्यकतेनुसार फिजिओथेरपिस्टची उपलब्धता.

• शंभर टक्के प्रदुषण विरहित वातावरण.

• ग्रंथालय, प्रोजेक्टरची सोय असणारे बहुउद्देशिय सभागृह.

किती कालावधीसाठी
दाखल करता येऊ शकते ?

दीर्घ कालावधीसाठी : काही महिने / वर्ष किंवा अगदी आजन्मही सेवा घेता येते.

अल्प कालावधीसाठी : काही दिवस किंवा  आठवड्यांसाठीही सेवा घेता येते.

डे केअर सेंटर : आवश्यकतेनुसार रोज दिवसा किंवा रात्री काही तासांसाठी.

केंद्रांमधील उपलब्ध सेवा.

• रुग्णांच्या गरजेनुसार दीर्घकालीन / अल्पकालीन निवासाची सोय.

• अंथरूणाला खिळलेल्या रुग्णांसाठी प्रशिक्षित परिचारिकां- मार्फत, घरगुती वातावरणात देखभाल.

मेडिकल इमर्जन्सीच्या स्थितीत लागणाऱ्या वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता.

• २४ तास वैद्यकीय सुविधांची उपलब्धता.

• पोर्टेबल एक्सरे व पॅथॉलॉजी, रुग्णवाहिकेची सुविधा.

We served over 5000+ Patients

Lets know moreel necessitatibus dolor asperiores illum possimus sint voluptates incidunt molestias nostrum laudantium. Maiores porro cumque quaerat.

Amazing service!

John Partho

They provide great service facilty consectetur adipisicing elit. Itaque rem, praesentium, iure, ipsum magnam deleniti a vel eos adipisci suscipit fugit placeat.

Expert doctors!

Mullar Sarth

They provide great service facilty consectetur adipisicing elit. Itaque rem, praesentium, iure, ipsum magnam deleniti a vel eos adipisci suscipit fugit placeat.

Good Support!

Kolis Mullar

They provide great service facilty consectetur adipisicing elit. Itaque rem, praesentium, iure, ipsum magnam deleniti a vel eos adipisci suscipit fugit placeat.

Nice Environment!

Partho Sarothi

They provide great service facilty consectetur adipisicing elit. Itaque rem, praesentium, iure, ipsum magnam deleniti a vel eos adipisci suscipit fugit placeat.

Modern Service!

Kolis Mullar

They provide great service facilty consectetur adipisicing elit. Itaque rem, praesentium, iure, ipsum magnam deleniti a vel eos adipisci suscipit fugit placeat.

Partners who support us

Lets know moreel necessitatibus dolor asperiores illum possimus sint voluptates incidunt molestias nostrum laudantium. Maiores porro cumque quaerat.